Great Sahyadri Photo Challenge – 1

बोम्बल्या फकीर उर्फ रवी पवार ने सुरु केलेल्या Great Sahyadri Photo Challenge मधील माझे पहीले आवर्तन. यात मी काढलेले सह्याद्रीचे, गडदुर्गांचे ५ फोटो आणि सोबत काही माहीती मराठी तसेच इंग्रजीतुन लिहिली आहे.

!!दुर्गराज रायगड!!

माझा पहिला फोटो दुर्गराज रायगडाचा!! टकमक टोकाच्या रस्त्यावरुन मे २०१० च्या उन्हात काढलेला फोटो. यात रायगडची बेलाग तटबंदी आणि जय-विजय बुरुजांत गुंफलेला महादरवाजा मध्ये जर वरती मनोरे आणि लगतच्या इमारती दिसतात

!!Fort Raigad!!

The capital of the Maratha empire… Fort Raigad! I clicked this picture from Takmak Tok in May 2010. One can see strong walls and the Mahadarwaja (main entrance) of the fort.

दुर्गराज रायगड

!!प्रचंडगड म्हणजेच दुर्ग तोरणा!!

नाव सांगायची गरज नाही. नावाप्रमाणे प्रचंड पसरलेला प्रचंडगड. म्हणजेच आधीचा तोरणा गड! छत्रपतींनी नामांतर केलेल्या काही भाग्यवंत गडांपैकी एक. रण’झुंजार’ माचीने नटलेला, स्वराज्यात यायचा अग्रमान मिळवलेला, राजधानी राजगडाशी डोंगरी नाळ जोडून असलेला, गिर्यारोहींचा आवडता “प्रचंडगड” !!!

!!Fort Prachandgad aka Torna !!

This picture needs no introduction. Yes, its Prachandgad aka Torna. One of the lucky forts was renamed by Chhatrapati Shivaji Maharaj. Jewelled by Zunjar machi, the First fort to be part of Swarajya and ridge connected to the capital Rajgad. No doubt its trekkers favorite fort !!

प्रचंडगड म्हणजेच दुर्ग तोरणा

!! रसाळगडावरची तोफ !!

तोफ म्हणजे १७व्या शतकात गडकोटांच्या सुरक्षेचे महत्वाचे अस्त्र. तोफेचे बरेच प्रकार: ओतीव/बांधीव (घडवण्यावरुन), लांब/कमी पल्ल्याच्या (मा-यावरुन), दगडी/लोखंडी (गोळ्यावरुन), मोठ्या/छोट्या (आकारावरुन), लोखंडी/पंचधातुच्या (वापरलेल्या पदार्थावरुन). लोखंडी गोळ्यांमध्येही भरीव/कुलपी असे प्रकार! कुलपी गोळ्यात आत शिशाच्या गोळ्या असत, गोळा फुटल्यावर या गोळ्या अधीक नुकसान करीत. या तोफांची काळजी कशी घ्यावी हे आज्ञापत्रात दिलंय. “पावसाळ्याआधी तेल,मेण लाउन ठेवाव्या. तोफेचा कान साफ करायची सामग्री, तोफ डागल्यावर तापमान कमी करायला पाण्याची व्यवस्था, तोफेच्या गाड्यासकट ३-४ सैनिक एैसपैस मावतील इतकी जागा बुरुजावर असावी. किल्ल्याजवळच्या डोंगरावर धमधमे रचुन, त्यावर तोफा चढवुन हल्ला करता येतो त्यामुळे गडकोट बांधताना हा विचार ध्यानात घ्यावा. इत्यादी. ” जागेअभावी जास्त देत नाही. किरण शेलारांसोबतच्या रसाळगडाच्या संस्मरणीय ट्रेकमधील छायाचित्र.


!! Canon of Rasalgad !!

Canon was one of the solid defending structures in the 17th century. Cannons can be classified based on their make, range, type of ammunition, size and material used for building cannons. How one should take care of canon-related stuff is described in Adnypatra (ancient document): “Before monsoon, canon should be layered with oil and wax to protect them from rusting. Tower mounted with canon should be spacious enough to rotate canons on wheels and 3-4 soldiers. These towers should be equipped with tools to maintain canon and water facilities to cool down the temperature after firing. One can attack hill forts easily by mounting long-range canons on nearby hills. Hence this should be taken care of while constructing forts. etc.” The description was cut short due to space constraints. The above picture is from a memorable trek with Kiran Shelar.

रसाळगडावरची तोफ


!! विसापूर गडावरील चुन्याचा घाणा !!

गडकोट बांधताना दगडी चि-यांमध्ये जे मिश्रण चिकटण्यासाठी वापरायचे ते बनवायला बाजुलाच चुन्याचा घाणा असायचा. चुना, गुळ, उडीद सारखे पदार्थ यात एकजीव करायचे. उभे दगडी चाक बैलांकडुन त्याखालील गोल खाचेत फिरवायचे. सर्व मिश्रण या खाचेत भरडून एकजीव व्हायचे. ब-याच गडकोटांवर हे आजही पहावयास मिळते.

!! “Chunyacha Ghana” on Fort VIsapur !!

It’s a grinding instrument built out of stone used to fine-grind cementing material used for construction. The vertically placed stone wheel rotates in a circular path constructed beneath with the help of bulls. The wheel’s weight ensures a fine grind of the materials below the engraved path! These structures are still intact on many forts in Maharashtra.

विसापूर गडावरील चुन्याचा घाणा


!! कोरीगडावरील तळे !!

गडकोटांवर पाण्याची दोन प्रमुख स्त्रोत: तळी आणि टाक्या. पाण्याची टाकी खोदीव वा चि-यात बांधुन काढलेली म्हणजे मानवनिर्मित असतात. पण तळी निसर्गनिर्मित वा मानवनिर्मित असतात. किल्ल्यांच्या बांधकामासाठी लागणारा कातळ सहसा गडावरतीच खड्डे खणून काढला जायचा. त्यात फायदे असे: गडाखालुन/बाहेरुन आणलेला दगड वर चढवण्याचे श्रम जास्त. त्यात लागणारा वेळ, पैसा व मनुष्यबळ/प्राणिबळ वाचायचा आणि झालेल्या खड्ड्याचा तळे म्हणुन वापर !! खड्ड्याला चारी बाजुंनी चिणून बांधले की झाले तळे तय्यार!! एका दगडात दोन पक्षी !! रायगडाचा गंगासागर तलाव ही अशीच निर्मीती.


!! Korigad water reservoir !!

There are two primary water sources on hill forts: ponds and tanks. Water tanks are mostly built out of stone or carved inside stony walls of hills; hence both types are man-made. Ponds are maybe man-made or naturally exist. Stone required during the fort’s construction was used to dig out from the fort plateau. The advantage is no need to import stone from the hilltop, which is heavy work and demands money, human power & huge time (considering there were no machines back then). And the vast potholes left out on the plateau after digging out stone can be used as water ponds !! Two things accomplished with one shot !! Gangasagar Talav on Fort Raigad is one the examples.

कोरीगडावरील तळे


सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *