निकोलोओ मनुची

मुघलांचा भारतातील वास्तव्याचा इतिहास “Storia do Mogor” लिहिणारा निकोलोओ मनुची (1639–1717) !! निकोलोओ मनुची इटालियन प्रवासी होता. याने बरेचसे आयुष्य भारतात मोगलांच्या गोटात घालवले. प्रसिध्द पुरंदरच्या तहाच्या वेळी हा मिर्झा राजे जयसिंग यांच्या गोटात होता. त्याचा “भारताचा इतिहास : तैंमुरलंग ते औरंगजेब” (Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb) हे फ्रेंच चित्रपुस्तकही प्रसिध्द आहे.

मनुची आणि शिवरायांची पहिली भेट झाली मिर्झा राजे जयसिंग यांच्या तंबुत. मिर्झा राजे, त्यांचा ब्राम्हण पुरोहीत व मनुची तंबुत गंजिफाचा डाव खेळत होते तेव्हा शिवरायांचा प्रवेश झाला. तिघेही उभे राहीले. आसनस्थ झाल्यावर महाराजांनी मनुचीबद्दल विचारपूस केली. राजे जयसिंगांनी त्याची ओळख फिरंगी देशके राजा अशी करुन दिली. त्यावेळचे मनुचीचे वर्णन असे की, साधारण २४-२५शीतला रुबाबदार तरुण. वर्ण गोरा. अंगाने सुदृध आणि निरोगी. महाराजांनी त्याचे योग्य शब्दात कौतुक केले, मनुचीने लगेच गुडघ्यावर उभा राहुन मुजरा केला. ही त्यांची पहिली भेट!

Introduction by Niccolao Manucci before Shivaji’s portrait in his book Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb

मनुचीला हिंदुस्थानी व पर्शियन भाषा अवगत होत्या त्यामुळे संभाषणाला त्याला फार अडचण येत नसे. महाराजांनी त्याच्याशी युरोपीयन राजवटी व राजघराण्याबद्दल गप्पा मारल्या.

King Shivaji Portrait in Niccolao Manucci’s book

 मनुचीलाही भारताबद्दल व हिंदु धर्माबद्दल कुतूहल असावे कारण त्याच्या “Storia do Mogor” ग्रंथात त्याने हिंदु धर्माबद्दल बरेच लिखाण केले आहे. हिंदुंच्या देवतांबद्दल कल्पना, या जगाबद्दलच्या संकल्पना, जातीव्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था, लग्नरिती, पशु, पिके, फळे असे लिखाण केले आहे. त्याने आपल्या Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb या चित्रपुस्तकात महाराजांचे जे चित्र काढले आहे त्यावरुन त्याची बारीक नजर दिसुन येते. महाराजांचे सरळ नाक, कोरीव दाडी बरोबर रेखली आहे. सैन्यच्या हातात पट्टे आणि तलवारी आहेत. त्या तलवारीच्या मुठी ‘मराठा’ पध्दतीच्या दाखवल्या आहेत हे विशेष. महाराजांनी हातात रत्नजडीत पट्टा, त्यांच्यापुढे चाललेले दोन सेवक ; एकाने सरळ पात्याची तलवार (संभाव्य भवानी तलवार) तर दुस-याने मुकूट (शिरस्त्राण?) पकडले आहे. असे बारकावे त्याने चित्रात टिपले आहेत.

मनुचीचे हे ग्रंथ नंतर भाषांतरीत करुन प्रकाशीत केेले आहेत. अधिक माहितीसाठी खालील दुवे पहा.

Storia do Mogor:

भाग १      भाग २     भाग ३     भाग ४

Histoire de l’Inde depuis Tamerlank jusquà Orangzeb

संदर्भ :
राजा शिवछत्रपती (लेखक- बाबासाहेब पुरंदरे)
शककर्ते शिवराय (लेखक- विजयराव देशमुख)
http://www.archive.org/
http://gallica.bnf.fr/

सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *