-
कुठलाही ठराविक विषय नाही, फक्त शब्दांमधून वाहणारा एक प्रवाह आहे – जसा आहे, तसाच.
-
कॉलेजमधली मैत्री म्हणजे आयुष्याच्या सर्वात खास आणि निखळ आठवणी. कट्ट्यावरचा चहा, शेवटच्या बाकावरची खसखस, बिनधास्त गप्पा, आणि आयुष्यभराची साथ.
-
अगदी मनात भरून राहणारा विषय — कॉलेजच्या दिवसांतलं प्रेम! त्या दिवसांमध्ये असतो एक वेगळाच गंध… पहिली नजर, पहिलं हसू, वर्गातली ती जागा, कट्ट्यावरच्या गप्पा, आणि न सांगता आलेल्या भावना.
-
काही वेळा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच कविता बनतो. या भागात अशा काही ओळी आहेत ज्या स्वतःशीच केलेल्या संवादासारख्या वाटतात – थोडं प्रश्नांचं आणि थोडं उत्तरांचं रूप घेऊन
-
अव्यक्त प्रेम – एक साठवून ठेवलेली भावना, जी उघड करायचं धाडस आजही त्याच्याकडे नाही. म्हणून आज शब्द त्याचे साथीदार झालेत.
-
कधी काही नातं संपून जातं, पण त्या नात्याचं अस्तित्व मात्र शब्दांमध्ये जिवंत राहतं. ती व्यक्ती दूर गेलेली असते, पण तिच्या आठवणी अजूनही लेखणीला चालना देतात.
-
तुझ्या जाण्यानं रिकामं वाटलं खरं, पण शून्यातूनही नवं काही उगम पावतं, हे आज जाणवतंय.
-
जेव्हा ती नसते, तेव्हा आयुष्याचा तोलच बिघडतो, आणि मनातले सर्व हिशोब फसतात…
-
प्रतीक्षेची, आशेची आणि अनुत्तरित प्रश्नांनी भरलेल्या मनाची एक शांत पण खोल खोलवर जाणारी हाक.
-
जेव्हा नातं, भावना, आणि आशा सर्व काही विरून जातं, आणि उरते एक शांत शून्यता…