दोन वाक्यातला चिमुकला ठिपका…
बरंच काही सांगणारा…
पाहिलं तर एका गोष्टीचा शेवट..
पाहिलं तर दुस-या गोष्टीची सुरवात..
पाहिलं तर दोन गोष्टीमधला अडसर..
पाहिलं तर त्याच गोष्टींना जोडणारा दुवा….
आपल्याला एका शेवटाकडुन दुस-या सुरवातीकडे नेणारा..
पण गेलेला भुतकाळ चांगला की येणारा भविष्यकाळ याबाबत मौन बाळगणारा…
कधी मागे राहीलेल्या गोड आठवणी दाखवुन चिडवणारा तर कधी सोडुन आलेले सर्व कडू क्षण विसरायला शिकवणारा..
गोष्टी सुरु होतात…गोष्टी सरतात…
हा मात्र नेहमी तिथेच…. दोहोंच्या मध्ये… एकदम भावनाशुन्य….
ना गेलेल्या भुतकाळाचं सुख दु:ख, ना येणा-या भविष्याची उत्सुकता….
व्याकरणाच्या दृष्टीकोनातुन पाहीले तर पुर्णविराम म्हणजे दोन वाक्यामधली विभाजकाची ठळक भूमिका…
पण आयुष्यात सगळेच पुर्णविराम असे नसतात. काही असतात…धूसर…अंधूक…अस्पष्ट….
मागे व पुढे या दोन कालखंडांना जोडणारे किंवा तोडणारे… मागुन पुढे जाताना एकच प्रश्न विचारणारे…
“बाबा, मला ओलांडून पुढे जातोयस… विचार कर… मागे घडलेले चागंले होते का वाईट.. कारण पुढे काय घडणार आहे हे ना तुला माहित ना मला!!”
काही जण थांबतात.. गोधंळतात..मागे फिरतात.. काही सरळ जातात…सगळेच जण काही ठोकताळे बांधुन इथे निर्णय घेतात.. कारण इथे काहीच ठळक नसते…. असे प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहतात..
तुम्ही ओलांडलाय का कधी असा पुर्णविराम???
Thanks to Maggie – First listener, inspiration, motivator and my best buddy !
Megz, few edits here from main draft 🙂
Leave a Reply