पावसाचा खेळ

दरवर्षी पाऊस येतो तसा या वर्षीही आला
माझ्या मनातले गुपीत मलाच सांगुन गेला

त्या गार वा-यासारखं मन सैरावैरा पळतं
पावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहतं

मग पावसाच्या सरींवर सरी कोसळत राहतात
आठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोर उलघडत नेतात

अखेर सर्व शांत होतं पाऊसही निघून जातो
माझ्या भावनांचा डाव अर्ध्यावरतीच मोडून जातो
-श्रीकांत लव्हटे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *