आयुष्याच्या वाटेवर……
आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही……
-श्रीकांत लव्हटे
वळणावर!!!!!!!!!
या वळणावर निघुन गेलीस,
म्हणून मी थांबणार नाही
कारण मला माहीत आहे की,
पुढच्या वळणावर तु भेटल्याशिवाय राहणार नाही…….
-श्रीकांत लव्हटे
चाललो मी……
वाट बघुन त्रासलो आहे ,
डोळ्यात प्राण आणून थकलो मी
येणार आहेस का नक्की सांग,
नाहीतर हा चाललो मी……
-श्रीकांत लव्हटे
मनातले भाव ……
मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले….
-श्रीकांत लव्हटे
एकदातरी तुला अडवणार आहे…
जायची म्हणून जाऊ द्यायचे का?
निघाली म्हणून निरोप द्यायचा का?
माझंही काही कर्तव्य आहेते मी करणार आहे
जायच्या आधी एकदातरी तुला अडवणार आहे…
-श्रीकांत लव्हटे
आतापर्यंत ……
आतापर्यंत हेच म्हणालो की
आता झालं – गेलं जाउ देत..
पण आता मी तसं म्हणणार नाही
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही….
-श्रीकांत लव्हटे
मी तयार आहे……
प्रयत्न करायला मी तयार आहे
मैदानात उतरायलाही तयार आहे
पण हार आधीच निश्चित असेल
तर मैदानात उतरायची तरी काय गरज आहे????
-श्रीकांत लव्हटे
मजा….
कुणितरी ऐकतयं म्हणुन गाण्यात मजा नाही
कुणितरी पाहतय म्हणुन कॉलेजला जाण्यात मजा नाही
ऐकणा-याने दाद दिली तर मजा
पाहणा-याने नजर दिली तर मजा !!!!!!!!!
-श्रीकांत लव्हटे
आपले आपले…….
प्रतिबिंबाला पाहून ,
हे जग फसते आहे
आपले आपले म्हणत,
भासांच्यामागे पळते आहे…..
-श्रीकांत लव्हटे
किती वेळ ….
असे किती वेळ चालायचे
आम्ही विचा-यांच्या हिदोंळ्यावर झुलायचे
खाली पडून पुन्हा उभे रहायचे
आणि पुन्हा रोज नव्याने जगायचे…
-श्रीकांत लव्हटे
आकाशही तुझेच आहे…
रडत बसू नकोस तु
लढण्यास तयार हो तु
फक्त एकदा मनाशी ठरव
आणि मग बघ ही जमीन तुझीच आहे
आणि हे आकाशही तुझेच आहे…
-श्रीकांत लव्हटे
अस्तित्व…..
जुन्यातुन नव्यात,
नव्यातुन जुन्यात
मन फिरत राहतं पुन्हा पुन्हा
आणि शोधत राहतं आपल्या
अस्तित्वाच्या पाऊलखुणा
जुन्यात रमले तर नव्या वाटा खुणावतात
नव्यात रमले तर जुन्या आठवणी येतात
नक्की कोणाला आपले करावे कोणाला परके
यालाच मन संभ्रमित होतं
आणि दोन्हीकडे आपल अस्तित्व शोधत राहतं….
-श्रीकांत लव्हटे
असाच चालत रहा
आभाळ तुझेच आहे
गरज आहे पंख पसरण्याची..
वाराही तुझ्याच बरोबर आहे
गरज आहे भरारी घेण्याची..
आतापर्यंत कधी मागे पाहीले नाहीस
आताही पाहु नकोस
असाच चालत रहाप्रगतीच्या वाटेवरी……..
–श्रीकांत लव्हटे
वाट ………
सगळे काहि संपण्याची वाट पाहिलीसच का?
ती चितेवर येण्याची वाट पाहिलीसच का?
आधीच विचारले असतेस मनातले
तर तुला चितेवर जायची वेळ आली नसती
आणि तिला अश्रू ढाळण्याची……….
-श्रीकांत लव्हटे
प्रेमाची व्याख्या….
आजुबाजुला पाहुन वाटते
आता प्रेमाची व्याख्याच बदलली आहे
चेह-यावर उसने भाव न् नकली भावप्रर्दशन
यात आता खरे प्रेमच हरवले आहे…….
-श्रीकांत लव्हटे
वारा……
रोज झोंबणा-या वा-याला
आता सांगणार आहे मी
नको देउस तिची अशी आठवण
पुरता संपलो आहे मी…..
–श्रीकांत लव्हटे
आशा…….
ती गेली म्हणुन रडत बसू नकोस,
तुटलेल्या ह्रदयाचे तुकडे मोजू नकोस
पुन्हा नव्याने उभा रहा,
परिस्थितीला सज्ज रहा
कुणास ठाऊक नशीबात काय ठेवलंय,
शेवटी या जगात आशेने कोणाला सोडलंय…
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply