खरंच कळत नाही आता मला
तुझ्या डोळ्यात खरंच माझ्यासाठी प्रेम होतं
का ते मा माझ्याच डोळ्याचं प्रतिबिंब
तुझ्या डोळ्यात पाहीलं होतं
खरंच कळत नाही आता मला
तुझ्या ओठांवरचं ते गोड हसु
माझ्याबद्दलच्या उर्त्स्फुत भावना होत्या
का मैत्रीची एक औपचारीकता तु पाळत होतीस
खरंच कळत नाही आता मला
तुझ्या विचारांमध्ये का मी रात्र रात्र भर जागलो
दिवसाही मी तुझ्याच विचारात राहुन
आयुष्याच्या वाटेवर पुर्णपणे हरवलो
खरंच कळत नाही आता मला
मी असा कसा वागलो
सगळ्यांना सांगता सांगता
मीच एकतर्फी प्रेमात पडलो….
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply