poem

श्रावण..

श्रावण…….. रिमझीम धारांचा, कोसळणा-या सरींचाश्रावण…….. थंड वा-याचा, डोंगरावरच्या ढगांचाश्रावण…….. लोभस इंद्रधनुष्याचा, ऊन पावसाच्या लपंडावाचाश्रावण…….. नव्या हिरवाईचा, झुळूझुळू वाहणा-या ओढयांचाश्रावण…….. नाचणा-या मोरांचा, पानांमधुन लाजणा-या फुलांचाश्रावण…….. उत्स्फुर्त गीतांमधला, निर्सगाच्या उत्सवाचाश्रावण…….. माझ्या मनातला, तिच्या गोड आठवणींचा………………………-श्रीकांत लव्हटे

कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस…

तेव्हाही होताच की हा गार पावसाळारिमझिमणा-या सरींचा कोसळणा-या धबधब्यांचापण त्याच्यांतली नि:शब्दता कधी जाणवलीच नव्हतीकारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस…………… तेव्हाही होतच होती रोज संध्याकाळरूपेरी किरणांचा असा तो काळपण ती कातरवेळ कधी अनुभवलीच नव्हतीकारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस…………… तेव्हाही स्वप्नांच्या देशा जायचे मनमग मी जगायचो तिथला प्रत्येक क्षणपरतल्यावर कधीच कोणाची आठवण झाली नव्हतीकारण …

पावसाचा खेळ

दरवर्षी पाऊस येतो तसा या वर्षीही आलामाझ्या मनातले गुपीत मलाच सांगुन गेला त्या गार वा-यासारखं मन सैरावैरा पळतंपावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहतं मग पावसाच्या सरींवर सरी कोसळत राहतातआठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोर उलघडत नेतात अखेर सर्व शांत होतं पाऊसही निघून जातोमाझ्या भावनांचा डाव अर्ध्यावरतीच मोडून जातो-श्रीकांत लव्हटे

आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे…

आजकाल अश्रु करतात नेहमीच गांलावर खेळमग प्रत्येक संध्याकाळ होते सुरेख कातरवेळतुझा चेहरा आजही मनाच्या आरशात हसत आहेतुझ्या आठवणींबरोबर आजही जगत आहे आठवणींच्या धुक्यात मन स्वत:ला हरवून बसतंमग वास्तवात आल्यावरही स्वत:ला शोधत राहतंनकोत मला तुझ्या आठवणी असं रोजच म्हणतो आहेतरीही तुझ्या आठवणींबरोबर आजही जगतो आहे तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण रोज एकटयानेच अनुभवतोवास्तवाला विसरुन स्वत:ला स्वत:त हरवून बसतोमन …

एक अश्रु…

जेव्हा असतो बाळाचा, आई असते टिपायलाजेव्हा असतो पावसाचा, धरती असते टिपायलाजेव्हा असतो श्रमाचा, विसावा असतो टिपायलाजेव्हा असतो दु:खाचा, मित्र असतो टिपायलाजेव्हा असेल माझा, तेव्हा तु येशील ना टिपायला ?……………-श्रीकांत लव्हटे

मी कधीच नाही म्हटंल की…

मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुनकदाचीत माझ्या नजरेतला भाव तुला कधी कळलाच नाही म्हणुन मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुनमाझ्या डोळ्यातुन ओघळणारा अश्रू तु कधीच टिपला नाहीस म्हणुन मी कधीच नाही म्हटंल की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणुनभोवतालच्या मित्र-मैत्रिणींच्या गर्दीत मला कधी पाहीलच नाहीस म्हणुन मी कधीच …