“मराठी चारोळ्या” नामक व्हाट्सअँप ग्रुपवर झालेली चारोळ्यांची देवाणघेवाण!
काही अबोल शब्द
काही अव्यक्त भावना…
सारे काळाचे निर्णय
राहील्या असंख्य वेदना…
–श्रीकांत लव्हटे
वेदनेला कुणी हाक मारु नये
भेटलेल्या सुखा दुर सारु नये..
का तुझा जाळशी व्यर्थ मधुमास तु..
एकदा हास तु…एकदा हास तु…
–आदिती
एकासाठी एक थांबलेला असतो
एकासाठी एक जगलेला असतो
एकामुळे एकाला पुर्णत्व येते
जिवनाची खरी सुरवात तिथुनच होते…
–आदिती
प्रत्येक सुरवातीला एक शेवट आहे
प्रत्येक दिवसाला एक रात्र आहे
जाणा-याला हसत निरोप द्या कारण
येणारा हा कधीतरी जाणारच आहे
–श्रीकांत लव्हटे
दुर जाताना कधी काही बोलायचे नसते
भरल्या डोळ्याने फक्त हसायचे असते
पुढल्या भेटीचा वायदा करुन
हळुच मागे वळायचे असते…
–आदिती
पुढली भेट ही सारी स्वप्नं
नको ठेऊस असल्या आशा..
विसरुन सारे पुढे चालायचे
स्वप्नात लपते नेहमीच निराशा…
–श्रीकांत लव्हटे
आशा-निराशा जिवनाचे अंग
त्यातच भरावे स्वप्नांचे रंग
झाले जरी स्वप्न भंग
त्यातच भरावे नवीन रंग…
–आदिती
जमा-खर्च…
देवा, जमंलं तर एक कर
तिची सारी दु:ख माझ्या नावी जमा कर
हवं तर त्यासाठी
माझी सगळी सुखं खर्च कर…
–श्रीकांत लव्हटे