चारोळ्या भाग ६

पाउलखुणा

सरलेल्या स्वप्नांना मागे सारुन
नव्याने स्वप्नं पहायची असतात
सोडुन गेलेल्या पाऊलखुणांणाच
आपल्या पायवाटा बनवायच्या असतात
-श्रीकांत लव्हटे

दवबिंदु

पानावरती रेघ सांडून
दवबिंदु तो ओघळलेला
पानाची साथ सोडुन
धरणीवरी विसावलेला…
–श्रीकांत लव्हटे

मन
मन हे असच असत
कुणाच्याच बंधनात नसते
आपणही त्याबरोबर धावायचे असते
सत्यातले अशक्य अंतर
स्वप्नातच कापायचे असते
–श्रीकांत लव्हटे

गारव्याने ढगांना गाठले
डोंगराच्या कुशीत
मन चिंब चिंब भिजले
तुझ्या आठवणींत…..
–श्रीकांत लव्हटे

सरींवर सरी कोसळल्या
मेघ बरसुन गेले
मनाच्या रेताड मैदानावर
कोण गारवा शिंपडून गेले
–श्रीकांत लव्हटे

फक्त चिमुटभर प्रेमासाठी
आयुष्यभर झगडलो मी….
तुझ्याशिवाय जगणे नको म्हणुन
शेवटी मरणालाच कवटाळले मी…..
–श्रीकांत लव्हटे


नको तुझ्या आठवणी
नकोच त्यांची साथ
मी आपला एकटाच बरा
माझ्या मुक विश्वात….
–श्रीकांत लव्हटे

मन

मलाही मन आहे गं
पण तुला ते कसं कळणार
पाठमो-या माझ्या डोळ्यातले अश्रु
तुला तरी कसे दिसणार….
नव्हतीच आपली कहाणी कधी
तरी बांधले स्वप्नांचे महाल
अगं कपाळावरच्या रेषा तरी
कोण कसे पुसणार…..
— श्रीकांत लव्हटे

भुंगे
सगळेच भुंगे सारखेच नसतात
काहीजण त्यांच्या मनात
प्रेमाचे धागेही जपतात
ओरबडणारे सारे भुंगेच असतात
पण,
पाकळीत बंद होउन प्राण त्यागणारे
विरळेच असतात…..
–श्रीकांत लव्हटे

प्रेमाचा खेळ

खरंच यार….
दोस्तीनंतरचा प्रेमाचा खेळ
आता नकोसा वाटतो…
निशब्द रात्री…
दुरावलेला सहवास…
रीकामी स्वप्नं…
आणि शांत झालेला संवाद
भकास आभाळ
काळवंडलेला चंद्र
हरवलेल्या चांदण्या नि
दुरावलेला गंध….
खुप काही गवसलंय मला
म्हणुन आता….
प्रेम हा शब्दच नकोसा वाटतो…

–श्रीकांत लव्हटे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *