मी आभारी आहे तुझा……….

मी आभारी आहे तुझा
माझ्या जीवनात येण्याबद्दल
आणि येउन पुन्हा
एकट्याला सोडून गेल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
मला स्वप्नं दाखवल्याबद्दल
स्वप्नातुन परत
वास्तवात आणल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल
आणि पुढचा प्रवास
अर्धात सोडून गेल्याबद्दल

मी आभारी आहे तुझा
जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल
जाता जाता याच होडीला
वादळात सोडून गेल्याबद्दल

बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीस
दुस-या कुणीही नसती
इतकी दु:खं पचवली
मी आभारी आहे तुझा
याही गोष्टीसाठी……..

–श्रीकांत लव्हटे

Comments

Leave a Reply to Sagar Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *