माहीती :
पाली…पालीचा बल्लाळेश्वर गणपती…अष्टविनायकाचे एक रुप… पालीने या हि-यासवे अजुन एक हिरा जपुन ठेवला आहे… पगडीचा किल्ला!! म्हणजेच सरसगड…. बल्लाळेश्वर आणि सरस अगदी बाजुबाजुला. म्हणजे बल्लाळेश्वराच्या दारात उभे राहीलात तर समोर गणराया आणि मंदीराच्या मागे सरस दिसतो…. लांबुन हा किल्ला पुणेरी पगडीसारखा दिसतो म्हणुन याला “पगडीचा किल्ला” असेही म्हणतात. पालीला जाताना रस्तांवरुन पहाल तर सरसच्या रांगेत अजुन ३ टेकडीवजा सुळके दिसतील. त्यांना “पांडवांची पाच बोटे” म्हणतात. असे म्हणतात अज्ञातवासात पांडवांनी एका रात्रीत ते सुळके खोदले. पाचवा सुळका खोदताना सकाळ झाली आणि तो अर्धवटच राहीला.
सरसगड पालीच्या पुर्वेस आहे. उंची सुमारे ४५० मीटर. बल्लाळेश्वराच्या मागुन, उजवीकडुन गडावर जायला वाट आहे. वाट सुकर असल्याने साधारण अर्ध्या-एका तासात वर पोहोचता येते. चढणीचा डोंगर संपवुन तुम्ही गडाच्या कातळपायथ्याला पोहोचता. मघापासुन छोटा वाटणारा किल्ल्याचा कातळ इथे आभाळात पोचलेला असतो. पावसात भिजलेला काळाकुळकुळीत उभा कातळ!! कातळाच्या डोक्याला बांधलेली दगडी चि-यांची तटबंदी लक्ष वेधुन घेते. जणु सरसने चढवलेला जिरेटोप! इथे दक्षिणेला कातळामध्ये नाळ आहे. तिच्यातच तब्बल ९६ दगडी पाय-या कोरल्या आहेत. पाय-यापर्यत पोहचण्यासाठी एक rocky patch चढावा लागतो. पावसाळ्यात शेवाळ आणि वाहते पाण्यामुळे पाय-या निसरड्या होतात. आणि आधारासाठी काही नसल्याने उतरताना काळजी घेत उतरावे लागते. मध्ये तुटक्या पायरीमुळे उड्या मारायला लागतात! नाळेचा जेमतेम अर्ध्या भागात पाय-या आहेत त्यामुळे जरा बाजुला घसरलो तर मधल्या खोबणीमध्ये पडुन सरळ दगडभेट!!
पाय-यांच्या शेव़टचा दरवाजा आपल्याला गडाच्या माचीवर सोडतो. दरवाजा कमानीकृती व दगडी भिंतीत आहे. दरवाज्यावर शरभ वा शुभपुप्ष नाही. एकुनच दरवाजा हिंदु/शिवकालीन मराठी बांधणीचा वाटत नाही. दरवाज्याच्या मागे ८-१० पहारेकरी सहज बसु शकतील अश्या देवड्या आहेत. देवड्यासमोरील पाय-या चढल्या की आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
माथ्यावर महादेवाचे मंदीर आहे. मंदीरासमोरच भगवा जरीपटका वा-यावर स्वैर फरफरत असतो. मंदीराकडे पाठ करुन तटबंदीवर उभे राहीले की डाव्या हाताला सुधागड दिसतो. मंदीराच्या मागे एका पीराचं ठाणं आहे. ठाणं डाव्या हाताला ठेउन तटबंदीवरुन पाहीले की बाजुला दिसतील पांडवांची पाच बोटे! तसाच पुढे वळणदार चालुन आलो की दुसरा दरवाजा दिसतो. गडावर येण्याची दुसरी वाट……या दरवाज्याला दुहेरी बुरुज आहेत.. मधल्या सुळक्याला पोखरुन टाक्यांसोबत गुहासुध्दा कोरल्या आहेत.
इतिहास :
भौगालीक स्थान
18°32’34.29″N 73°13’39.87″E
सरसच्या वाटेवर :
मुंबईवरुन NH-4 वरुन खोपाली मार्गे निघायचे. खालापुर फाट्यावरती महामार्ग सोडुन खोपोली-पाली रोडला वळायचे. खोपोली-पाली रोड ३२ कि.मी. नंतर थेट बल्लाळेश्वराच्या मंदीरापाशी नेतो. मंदीराच्या मागुनच गिर्यारोहणास सुरवात करु शकता.
सरसगड छायाचित्रे :
https://picasaweb.google.com/114462932814950334947/SarasGadTrek7_11_2010#
Leave a Reply