जाणारच होती अशी निघून
तर आलीसच का माझ्या आयुष्यात….
अश्रु देणारच होतीस डोळ्यात
तर दिलंसच का हसु माझ्या ओठांत..
वाट सोडूनच जाणार होतीस
तर चाललीसच का दोन पावलं बरोबर..
स्वप्नं पुर्ण करायचीच नव्हतीत
तर ती दाखवलीसच का..
ह्रदयात राहणार नव्हतीस
तर का मनाची दारं उलगडून गेलीस..
कितीतरी प्रश्न आहेत आज मनात
एकाचंतरी उत्तर दयायला परतुन येशील का ??????????
-श्रीकांत लव्हटे
Leave a Reply