After a long time……
लिहायला बसलो तरी
हल्ली मला कविताच सुचतच नाही
कारण तुझ्या आठवणींना
मी जवळसुध्दा येऊ देत नाही
तरी येतेस कधी कधी
तु माझ्या स्वप्नात
घेऊन जातेस मला
दुर वेगळ्याच विश्वात
त्या वेगळ्या विश्वात
आता मला रमायचे नाही
पुन्हा माझ्यातल्या मला
तुझ्यात हरवायचे नाही
पण काय करु,
जेव्हा तु स्वप्नात
अशी गोड हसतेस
झाल गेलं सगळं
पुर्ण विसरायला लावतेस
मग मी ही वेडयासारखा
तुझ्या आठवणींच्या मागे धावतो
स्वप्नातुन जागा झालो
की दचकुन अंथरुणात उठतो
हा असा भावनांचा पोरखेळ
वाटतं कधीच संपणार नाही
कदाचीत,
तुला विसरायचे गणित
मला कधीच जमणार नाही….
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply