खुप झाल्या कविता आणि
पुरे झाल्या चारोळ्या
अजुन किती दिवस ऐकशील रे
त्या दर्दभ-या आरोळ्या
सतत तिचा विचार करणे
कॉलेजमध्ये तिलाच शोधणे
जवळच्या मित्राशी बोलतानाही
सतत तिचाच विषय काढणे
तिच्याशी बोलावे ही एकच इच्छा
आणि दिवसभर त्याचीच स्वप्ने
समोर आली की मात्र
जुजबी बोलुन गप्प बसणे
अरे किती दिवस चालणार असे
कधी सांगणार आहेस तिला
आली संधी दवडू नकोस
नाहीतर कायम स्वप्नातच बघशील तिला
उधळून टाक वादळ मनातले
होऊन जाउ दे जे व्हायचे ते
सांग तिला गुपित मनातले
की माझं तुझ्यावर प्रेम आहे
माझं तुझ्यावर प्रेम आहे
माझं तुझ्यावर प्रेम आहे………………
-श्रीकांत लव्हटे
Leave a Reply