एक स्वप्नाची सांगता..

पाहीलं होतं मी एक स्वप्न
उगवत्या सुर्याचं,
पहाटेच्या दवबिंदुचं,
रिमझिमणा-या सरींचं,
चांदण्या रातींचं…..
पाहीलं होतं मी एक असं स्वप्न

उघड्या डोळ्यांनी पाहीलेलं ते स्वप्न
वाटलं होते प्रत्यक्षात येईल
खुप सोसलं होते आजवर
वाटलं आता सुखाची पहाट होईल

पण सुखाला माझी माहीतीच नव्हती
कारण मैत्री माझी दु:खाशी झाली होती
आजवरची कुठलीच स्वप्नं
प्रत्यक्षात कधीच उतरली नव्हती…

हेही एक स्वप्नंच होतं…
रात्री पडले आणि सकाळी विरलं…
विरता विरता पुन्हा एकदा मला
काळोखात ढकलुन गेलं….

आता या निष्प्राण जगात
मी खुप एकटा पडलोय
सगळे काही कळतंय गं मला
तरीही तुझ्या साथीची वाट बघतोय………..
–श्रीकांत लव्हटे

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *