गर्दीत हरवूनही स्वतःचा आवाज ऐकावा,
क्षणभर थांबून मनाशी संवाद साधावा..
रोजच्या धावपळीत श्वास मोकळा घ्यावा,
या मनाचा अनंताशी संवाद व्हावा…
षड़रीपूंना मनातून काढून टाकावं,
हसण्याने आयुष्य सहज करावं..
प्रेमाच्या नात्यांना जवळ धरून,
मायेच्या ऊबेने आयुष्य उजळावं…
खूप धावलो आता थोडं चालावं,
मनातल्या गोंगटाला कुठेतरी थांबवावं..
एकांताच्या शांततेत स्वतःला शोधत,
स्थिरचित्त आयुष्य जगावं..
-श्रीकांत लव्हटे
Leave a Reply