एकदा मी अंधाराला म्हणालो
तु असा कसा
आणि तुझे अस्तित्व काय
तु सर्वाचा नावडता
मग तु असण्याचं कारणच काय
यावर अंधार उत्तरला,
मीच आहे आंधळ्याची काठी
मीच आहे आंधळ्याचे जग
मीच आहे रात्रीची सोबत
मीच आहे काजव्यांची रग
हो मीच तो,
जो प्रकाशाने साथसोडल्यावर धावुन येतो
जो दिवसासुध्दा सावलीरुपाने
तुझ्याबरोबर असतो
मीच आहे जो
वर्षानुवर्षे जुनाट मंदीरात
देवमुर्तीला साथ देतो
मीच आहे जो
तुम्हाला उजेडाचे
महत्त्व पटवुन देतो
असा आहे मी
नसुन असणारा
आणि असुन न दिसणारा……….
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply