कविता या साहीत्यप्रकाराला मानाचा मुजरा..!!!
कविता म्हणजे शब्द
कविता म्हणजे भावना
कविता म्हणजे दु:ख
कागदावर लिहीलेल्या वेदना
कविता आहे छंद
काहीसांठी वेड
कविता आहे मन
आणि मनातलं सावरखेड
कविता आहे रम्य पहाट
कवितेतच सरतो सुंदर काळ
कविता लावते मनाला झुरझुर
कविता आहे कातरवेळीची सांज…
कविता आहे,
सुखाचा मित्र
दु:खातील सोबती
प्रेमीकांची साद
मंदीरातला मंजुळ नाद
कवींची सिध्दी
तळपता सुर्य
रिमझिम पाऊस
उतरती सांज
लेखणीची शाई
साहीत्याची आई
सृष्टीची हिरवाई
जीवनातली नवलाई…
अशी ही कविता
एकांतात असलो की नेहमी भेटुन जाते
त्या चार क्षणातही
तिच्याच गुजगोष्टी करुन जाते…….
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply