संध्याकाळी मी एकटा असताना
अलगद तिच्या आठवणींनी यावे
हलकेच… तरंगत मला त्यांच्यासवे न्यावे
ती भेटली की मी मग हसावे…
खुप खुप बोलावे…
तिची अखंड बडबड ऐकताना
स्वप्नातल्या सत्यालाही विसरुन जावे
मग आठवणींनी हलकेच येउन मनावर थाप द्यावी
सांगावे …
भेटीची वेळ संपली..निघायची घाई करावी
तिने नजरेनेच बोलावे “थांब ना जरा”
मीही तसेच उत्तरावे “उद्या भेटीला येईन की पुन्हा”…
तांबुस झालेल्या आभाळावर मग
अश्रुंचे सडे पडावेत
पाणावल्या डोळ्यांनी जग
अजुनच धुसर होत जावे
स्वप्न संपतात…
आठवणी विरतात…
मुठी हवेतच झाकल्या जातात
उठताना एकदा मावळत्या सुर्याकडे बघतो…
पुन्हा उगवण्याच्या जिद्दीवरचा
त्याचा तो प्रवास असतो…
डोळे मिटुन तिला मनभरुन पाहतो
सुर्याच्या जिद्दीने पावले वळवतो…..
“ते एक वळण होते….गोष्ट अजुन बाकी आहे”….
–श्रीकांत लव्हटे
Leave a Reply