• कधी काळी अनेक चेहरे, अनेक क्षण, अनेक आठवणी मनात घर करून असतात. पण काही माणसं अशी असतात की त्यांचं अस्तित्व इतकं खोलवर रुतून बसतं, की बाकी सगळं विसरून जातं.

  • तीची आठवण नुसती वेदनादायक नाही, तर कधी हळवी, कधी गोड, आणि कधी अगदी अव्यक्त असते. पावसाच्या थेंबासारखी, हलकी पण खोल परिणाम करणारी.

  • कधी काही भावना मनातच राहतात — न सांगता, न मांडता… फक्त एका आशेच्या धाग्यावर टिकलेल्या. ती त्याच्यासाठी सगळं जग होती, पण त्याचं प्रेम कधी तिच्यापर्यंत पोचूच शकलं नाही.

  • ती काही बोलत नाही… तरी तिचं अस्तित्वच इतकं मधुर आहे की सगळं काही शांत, सुगंधित आणि सुंदर वाटतं.

  • ती नसते तेव्हा प्रत्येक क्षण निस्तेज, प्रत्येक रंग फिकट. पण जेव्हा ती परतते — एक स्मितहास्य, एक शांत नजर — तेव्हा जग पुन्हा नव्याने फुलते

  • प्रेम मिळणं ही केवळ भावना नसून, ती एक अनुभूती असते — मनाला हलकं करणारी, अस्तित्वाला अर्थ देणारी.

  • श्रावण म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची उधळण, मनाला प्रसन्न करणारा पाऊस! हळुवार, सौंदर्यपूर्ण आणि आनंददायक भावनेने भरलेला प्रत्येक क्षण.

  • पावसाच्या प्रत्येक सरीत काहीतरी खास असतं — मातीचा सुगंध, ओलसर हवा, आणि मनात दाटून येणाऱ्या आठवणी…

  • शब्द नसलेले भावनांचे दवबिंदू,अश्रू .

  • एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्यावरही, तिच्या आठवणी मात्र सतत आपल्यासोबत असतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक जागा, प्रत्येक गंध… तिच्या अस्तित्वाची सावली बनून आपल्याला वेढून राहतात. ही कविता अशाच एका प्रवासाची कहाणी