College & ती….. माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी भाग २

असं नेहमी आपल्याबरोबरच का होतं
पहिल्यांदा सर्वाप्रमाणेच college बोअर वाटतं

अचानक एक दिवस तो गोड चेहरा वर्गात येतो
आणि अख्खी college life बदलवून जातो

मग पकाऊ लेक्चर असले तरी वर्गात बसावेसे वाटते
Result येत नसला तरी practical करावेसे वाटते

लायब्ररीमध्ये तासन् तास भुर्रकन उडून जातात
पुस्तकातली नाही तरी मनातली चार पाने वाचुन होतात

Extra lecture ठेवले तरी आपली त्याला ना नसते
आता तर रविवारी पण college मध्ये यायची तयारी असते

असे करता करता……
College ची चार वर्षे निघून जातात
जाता जाता डोळ्यामध्ये मात्र
विरहाची आसवे देऊन जातात…….

-श्रीकांत लव्हटे

Comments

  1. Unknown

    अस्तित्व…..

    जुन्यातुन नव्यात,
    नव्यातुन जुन्यात
    मन फिरत राहतं पुन्हा पुन्हा
    आणि शोधत राहतं आपल्या
    अस्तित्वाच्या पाऊलखुणा
    जुन्यात रमले तर नव्या वाटा खुणावतात
    नव्यात रमले तर जुन्या आठवणी येतात
    नक्की कोणाला आपले करावे कोणाला परके
    यालाच मन संभ्रमित होतं
    आणि दोन्हीकडे आपल अस्तित्व शोधत राहतं….

    really liked this poem…
    ur other poems are also really nice…
    seems you really took a lot of effort on your poems…
    wording choice, topics choosen are really good…

    keep it up..

    n all the best for rst of your life..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *