गेल्या वर्षीच्या वाढदिवसाला माझ्या जुन्या ब्लॉगवर लिहीलेले गा-हाणे….
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ॠतुत पाहीलय या दुर्गाला.. बरेचसे फोटो दरवेळचे.. ठिकाण तेच, जागा त्याच फक्त बदलले ते ॠतु आणि अँगल..
दु्र्ग पहावेत ते सह्याद्रीचे… रांगडे, दुर्गम तितकेच प्रेमळ, मनाला सुखावणारे…शतकोनशतके हा सह्याद्री एखाद्या आजोबांसारखा आपल्याला अंगाखांद्यावर खेळवतोय. किती पिढ्या, किती राजवटी, किती सत्तांतरे पाहीलेत याने…