स्वप्नांच्या मागे धावता धावतामी हरवलो..पडलो…सावरलो..पुन्हा धावु लागलो…नखे ठेचली..टाचा फुटल्या…तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने…देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं…तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत….. पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली…दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली… भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले…तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक नजर…आभाळ काही बोलले नाही…मंद हसले.. नजरेनेच खुण केली….सगळ्यांच्या …
श्रावण…….. रिमझीम धारांचा, कोसळणा-या सरींचाश्रावण…….. थंड वा-याचा, डोंगरावरच्या ढगांचाश्रावण…….. लोभस इंद्रधनुष्याचा, ऊन पावसाच्या लपंडावाचाश्रावण…….. नव्या हिरवाईचा, झुळूझुळू वाहणा-या ओढयांचाश्रावण…….. नाचणा-या मोरांचा, पानांमधुन लाजणा-या फुलांचाश्रावण…….. उत्स्फुर्त गीतांमधला, निर्सगाच्या उत्सवाचाश्रावण…….. माझ्या मनातला, तिच्या गोड आठवणींचा………………………-श्रीकांत लव्हटे
दरवर्षी पाऊस येतो तसा या वर्षीही आलामाझ्या मनातले गुपीत मलाच सांगुन गेला त्या गार वा-यासारखं मन सैरावैरा पळतंपावसाच्या प्रत्येक थेंबात तुलाच शोधत राहतं मग पावसाच्या सरींवर सरी कोसळत राहतातआठवणींचा चित्रपट डोळ्यांसमोर उलघडत नेतात अखेर सर्व शांत होतं पाऊसही निघून जातोमाझ्या भावनांचा डाव अर्ध्यावरतीच मोडून जातो-श्रीकांत लव्हटे