After long time…… लिहायला बसलो तरीहल्ली मला कविताच सुचतच नाहीकारण तुझ्या आठवणींनामी जवळसुध्दा येऊ देत नाही तरी येतेस कधी कधीतु माझ्या स्वप्नातघेऊन जातेस मलादुर वेगळ्याच विश्वात त्या वेगळ्या विश्वातआता मला रमायचे नाहीपुन्हा माझ्यातल्या मलातुझ्यात हरवायचे नाही पण काय करु, जेव्हा तु स्वप्नातअशी गोड हसतेसझाल गेलं सगळंपुर्ण विसरायला लावतेस मग मी ही वेडयासारखातुझ्या आठवणींच्या मागे धावतोस्वप्नातुन …
आठवतंय का तुला,तु मला पहिल्यांदादिसली होतीसमग मला ही दुनियाखुपच छान भासली होती आठवतंय ना तुला,तु माझ्याशीपहिल्यांदा बोलली होतीसत्या चार सेकंदात मीपुर्ण लाईफ जगली होती आठवतंय एकदा,दुर मैत्रिणींमधुन तुमला ‘हाय’ केलं होतसमाझं मलाच जामकौतुक वाटलं होतं खुप आठवतात मलाते सोनेरी क्षणरुपेरी स्वप्नांमध्येबागडणारे माझे मन तु सर्व आठवतेस की नाहीहे मला माहित नाहीपण मी सगळं रोज आठवतोयपाय …
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाहीडोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडूतुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेसस्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहूनतरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन माझं …
आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहेमाहीत आहे की तु येणार नाहीस,तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाहीसगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयंकळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवासगळं काही कुठेतरी …
आता तु नाहीस म्हणून काय झालेतु दिलेल्या आठवणी तरी आहेततुझ्या बरोबर राहीलेल्याप्रत्येक क्षणाच्या जाणिवा तरी आहेत तु नाहीस म्हणून काय झालेतुझा हसरा चेहरा सदैव मनात आहेतुझ्या अस्तित्वाच्या सावल्यांच्यापाऊलखुणा तरी आहेत आता तु नाहीस म्हणून काय झालेतुझ्याबरोबर पाहिलेली स्वप्नं तरी आहेतत्याच स्वप्नांच्या नगरात जायचीमाझी वाट तरी मोकळी आहे आता तु नाहीस म्हणून काय झालेतुझ्याकडून मिळालेली प्रेरणा …
आता मला कळून चुकलंयकी सारं काही संपले आहेआता चेह-यावरचं हसूसुध्दामाझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोयपुन्हा ऊभा राहण्याचातुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुनखाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगाततु हरवली आहेसआणि माझ्या जगातमीच मला शोधत आहे रडण्यासाठी आताडोळ्यात अश्रु उरले नाहीततुझ्याशिवाय माझे जीवनआता जीवन उरले नाही…………-श्रीकांत लव्हटे
जाणारच होती अशी निघूनतर आलीसच का माझ्या आयुष्यात…. अश्रु देणारच होतीस डोळ्याततर दिलंसच का हसु माझ्या ओठांत.. वाट सोडूनच जाणार होतीसतर चाललीसच का दोन पावलं बरोबर.. स्वप्नं पुर्ण करायचीच नव्हतीततर ती दाखवलीसच का.. ह्रदयात राहणार नव्हतीसतर का मनाची दारं उलगडून गेलीस.. कितीतरी प्रश्न आहेत आज मनातएकाचंतरी उत्तर दयायला परतुन येशील का ??????????-श्रीकांत लव्हटे
आता तुझ्या आठवणींत मी असेन की नाही माहीत नाहीपण माझ्या आठवणींत आता तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाही संध्याकाळच्या सोनेरी किरणांत चालतात तुझ्या आठवणींचे खेळमन मग दाटून येते जेव्हा सरते ती कातरवेळ रोज संध्याकाळी मंद हवेची एक झुळुक येतेमनाला स्पर्शुन तुझा गोड सुगंध देऊन जाते तुझ्याकडून काय होतं हे खरंच मला माहीत नाहीपण माझ्याकडचा होकार तुला कधी …
दर दिवशी संध्याकाळी,रम्य अशा त्या कातरवेळीतुझी आठवण नेहमीच येते,ओढत मला स्वप्नांच्या देशा नेते मन मग चालत राहते,काळाच्या वाटेवरुनतुझ्या भेटीचे सर्वच क्षण,झर्रकन जातात डोळ्यासमोरुन एकटा असलो तरीही,तु माझ्यासोबत असतेसगर्दीत असलो तरीही,गर्दीतून तु मला वेगळा करतेस अशावेळी मनाला पंख फुटतात,मन मुक्त विहार करत असतेवाटतं हा प्रवास असाच चालावा,पण परतण्याशिवाय गत्यंतर नसते-श्रीकांत लव्हटे
आजकाल अश्रु करतात नेहमीच गांलावर खेळमग प्रत्येक संध्याकाळ होते सुरेख कातरवेळतुझा चेहरा आजही मनाच्या आरशात हसत आहेतुझ्या आठवणींबरोबर आजही जगत आहे आठवणींच्या धुक्यात मन स्वत:ला हरवून बसतंमग वास्तवात आल्यावरही स्वत:ला शोधत राहतंनकोत मला तुझ्या आठवणी असं रोजच म्हणतो आहेतरीही तुझ्या आठवणींबरोबर आजही जगतो आहे तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण रोज एकटयानेच अनुभवतोवास्तवाला विसरुन स्वत:ला स्वत:त हरवून बसतोमन …