life

आयुष्य..

आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी …

आयुष्याची नवी सुरवात..

. नवी आशा, नवी उमंगनवी दिशा नवे तरंगनवा उल्हास, नवी चेतनानवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा नवा सूर्योदय नवी पहाटनवा निसर्ग नवा दिवसनवीन क्षितिज नवे आभाळनवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच विश्वास ज्योतीने फुलवलीआशेची विझलेली वातनव्या जोमाने आताआयुष्याची नवी सुरवात–श्रीकांत लव्हटे .

मी आभारी आहे तुझा……….

मी आभारी आहे तुझामाझ्या जीवनात येण्याबद्दल आणि येउन पुन्हाएकट्याला सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझामला स्वप्नं दाखवल्याबद्दलस्वप्नातुन परतवास्तवात आणल्याबद्दल मी आभारी आहे तुझादोन पाउलं बरोबर चालल्याबद्दलआणि पुढचा प्रवासअर्धात सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझाजीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दलजाता जाता याच होडीलावादळात सोडून गेल्याबद्दल बरं झालं तु माझ्याशीच अशी वागलीसदुस-या कुणीही नसतीइतकी दु:खं पचवलीमी आभारी आहे तुझायाही …

आठवतंय का तुला..

आठवतंय का तुला,तु मला पहिल्यांदादिसली होतीसमग मला ही दुनियाखुपच छान भासली होती आठवतंय ना तुला,तु माझ्याशीपहिल्यांदा बोलली होतीसत्या चार सेकंदात मीपुर्ण लाईफ जगली होती आठवतंय एकदा,दुर मैत्रिणींमधुन तुमला ‘हाय’ केलं होतसमाझं मलाच जामकौतुक वाटलं होतं खुप आठवतात मलाते सोनेरी क्षणरुपेरी स्वप्नांमध्येबागडणारे माझे मन तु सर्व आठवतेस की नाहीहे मला माहित नाहीपण मी सगळं रोज आठवतोयपाय …

सांग तिला…माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी

खुप झाल्या कविता आणिपुरे झाल्या चारोळ्याअजुन किती दिवस ऐकशील रेत्या दर्दभ-या आरोळ्या सतत तिचा विचार करणेकॉलेजमध्ये तिलाच शोधणेजवळच्या मित्राशी बोलतानाहीसतत तिचाच विषय काढणे तिच्याशी बोलावे ही एकच इच्छाआणि दिवसभर त्याचीच स्वप्नेसमोर आली की मात्रजुजबी बोलुन गप्प बसणे अरे किती दिवस चालणार असेकधी सांगणार आहेस तिलाआली संधी दवडू नकोसनाहीतर कायम स्वप्नातच बघशील तिला उधळून टाक वादळ …

आता सगळीच गणितं चुकली आहेत..

आता जीवनाची चक्रे थांबली आहेत,आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहेमाहीत आहे की तु येणार नाहीस,तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे पहाटेचा उत्साह आता राहीला नाही,संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाहीसगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयंकळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे,पक्षांची किलबिल आणि पावसातला गारवासगळं काही कुठेतरी …

सारं काही संपले आहे….

आता मला कळून चुकलंयकी सारं काही संपले आहेआता चेह-यावरचं हसूसुध्दामाझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोयपुन्हा ऊभा राहण्याचातुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुनखाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगाततु हरवली आहेसआणि माझ्या जगातमीच मला शोधत आहे रडण्यासाठी आताडोळ्यात अश्रु उरले नाहीततुझ्याशिवाय माझे जीवनआता जीवन उरले नाही…………-श्रीकांत लव्हटे

परतुन येशील का ????

जाणारच होती अशी निघूनतर आलीसच का माझ्या आयुष्यात…. अश्रु देणारच होतीस डोळ्याततर दिलंसच का हसु माझ्या ओठांत.. वाट सोडूनच जाणार होतीसतर चाललीसच का दोन पावलं बरोबर.. स्वप्नं पुर्ण करायचीच नव्हतीततर ती दाखवलीसच का.. ह्रदयात राहणार नव्हतीसतर का मनाची दारं उलगडून गेलीस.. कितीतरी प्रश्न आहेत आज मनातएकाचंतरी उत्तर दयायला परतुन येशील का ??????????-श्रीकांत लव्हटे