हिशोब दोन पावसाळ्यांचा बाकी मात्र शुन्यच…

####एका असफल प्रेमकहाणीला अर्पण####

मित्र म्हणतात
झाले गेले
विसर सगळे
चालायला फक्त
ओसाड रस्तेच आपले

तिची वाटच वेगळी रे
हिरव्यागार रानातली
आपण फक्त आठवायची
मनात जी जपलेली

अरे पण कसा विसरु मी
रोजचे ते बोलणे
गोड तो चेहरा आणि
तिचे ते हसणे

कसा मी विसरु
स्वप्नांचे ते महाल
अरे उध्वस्त कर सारे
आपला तो फक्त उजाड माळ

सहजच ती बोलुन जायची
तुझ्याच मनाचे सारे खेळ
कळुन चुकले सारे तुला
निघुन गेली जेव्हा वेळ

नको रडुस आता
सावर रे स्वत:ला
नशीबाचा डाव सारा
का कोसतोस स्वत:ला

कळतयं रे सगळं
तरी कळतच नाही काही
खुप जगायंच आहे रे
पण जगायला आता कारणच नाही

तिच्यात जग होतं माझे
पण तिच्यासाठी मी नगण्यच
हिशोब दोन पावसाळ्यांचा
बाकी मात्र शुन्यच………..

–श्रीकांत लव्हटे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *