आता तुझ्या आठवणींत मी असेन की नाही माहीत नाही
पण माझ्या आठवणींत आता तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाही
संध्याकाळच्या सोनेरी किरणांत चालतात तुझ्या आठवणींचे खेळ
मन मग दाटून येते जेव्हा सरते ती कातरवेळ
रोज संध्याकाळी मंद हवेची एक झुळुक येते
मनाला स्पर्शुन तुझा गोड सुगंध देऊन जाते
तुझ्याकडून काय होतं हे खरंच मला माहीत नाही
पण माझ्याकडचा होकार तुला कधी कळलाच नाही
खरंच,
आता तुझ्या आठवणींत मी असेन की नाही माहीत नाही
पण माझ्या आठवणींत आता तुझ्याशिवाय कोणीच उरलं नाही
-श्रीकांत लव्हटे