स्वप्नांच्या मागे धावता धावता
मी हरवलो..पडलो…
सावरलो..पुन्हा धावु लागलो…
नखे ठेचली..टाचा फुटल्या…
तरी धावतच होतो…जीवाच्या आकांताने..मनाच्या जिद्दीने…
देवाची माया…निर्सगाची छाया…सारं सारं काही संपलं होतं…
तरी मी तसाच बेभान, भन्नाट…कोणत्यातरी अनोळखी शक्तीने प्रेरीत…..
पावलाच्या दगडांनी जेव्हा रक्ताची धार चाखली…
दाहीदिशांनी जेव्हा नजरेची तिरीप झेलली…
भणानणा-या वा-याला अंगाचे चटके बसले…
तेव्हा सा-यांनीच नजरा वळवल्या.. आकाशाकडे…..सर्वांची एकच प्रश्नार्थक नजर…
आभाळ काही बोलले नाही…मंद हसले.. नजरेनेच खुण केली….सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या…
रक्ताळलेले पाय फुलांच्या पाकळ्यांवर पडत होते…दिशांनी स्वत:हुन बाजुला होउन वाट करुन दिली होती…झाकोळलेल्या सुर्य आपला मार्ग सोडुन माझी सोबत करत होता…वारा स्तब्ध होउन फक्त निरखत होता…
उन्हाळा गेला…आला श्रावण आला.. मोहरणा-या सरींचा….
–श्रीकांत लव्हटे (Special thanks to Akshata Godkar for hearing this all along and suggesting changes)
Comments
U Rock Bud…
very Inspiring…!!!