विनोदशी सहज बोलत असताना त्याने एक वाक्य लिहिले “शेवटी कपाळाला चिकटवलेल्या रुपयाची सुद्धा राखच होणार”. ते वाचून विचारांचं मनात काहूर उठलं. त्यातल्याच या काही ओळी कागदावर मांडल्या आहेत…
मी मी माझे माझे करत आयुष्य गेलं
सरतेशेवटी सांगा काय राहिलं
पंचतत्वाचा हा देह
पंचतत्वात विलीन झाला
रिकाम्या हाताने आला होता
रिकाम्या हातानेच गेला
जन्म म्हणजे सुरवात नाही
अन मृत्यू म्हणजे अंत नाही
आप्तजन फक्त सोबती प्रवासाचे
या आत्म्याला परमात्म्याशिवाय कोणीच नाही
-श्रीकांत लव्हटे
Leave a Reply