आषाढ वद्य प्रतिपदा (१३ जुलै १६६०)
शिवराय म्हणुन पालखीत बसुन सिद्दी जौहरच्या छावणीत वीरमरण पत्करणारे शिवा काशिद आणि छातिचा कोट करुन अखेरच्या श्वासापर्यंत लढत शत्रुच्या बंदुकीचा बार अंगावर झेलणारे बाजीप्रभु देशपांडे-कुलकर्णी या दोन विरांची आणि पन्हाळा ते विशाळगड घोडदौडीतील लढाईत झुंजणा-या झुंजार मावळ्यांची पुण्यतिथी …..
मुसळधार पाउस…सिद्दीचा वेढा…६०० धडधडणारी काळंजं…भयाण अंधार… नुसतं वाचलं तरी आज काळजात चर्रर्र होतं.. काय अवस्था असेल तेव्हा सा-यांची…
समोर मरण माहीत असुनही आपल्या राजासाठी प्राणार्पण करायला तयार झालेला शिवा काशिद…मागुन मसुदचा आलेला सैन्याचा लोंढा आणि मुठभर मावळ्यांनी मी खिंड लढवतो म्हणणारा बाजी.. कुठुन जमवली ही माणसे… जमवली नाही जोडली ! शिवरायांनी राज्य केले राजा म्हणून नाही तर पिता म्हणून!
जेधे शकावलीत तिथी नोंद असलेले हे सोनेरी पान!
३०० मावळ्यांनी गजापुरची खिंड लढवली. सप्टेंबर ४९० ख्रिस्तपुर्व मध्ये झालेल्या थर्मोपिलाईच्या युद्धात ३०० स्पार्टन्सनी ग्रीकसाठी जो एल्गार केला तो सर्व जगाला माहीत आहे पण त्याच तोडीचा संघर्ष इथल्या भुमीसाठी मावळ्यांनी केला हे त्या मानाने फार थोड्यांनी माहीत… ती थर्मोपिलाई खिंड, ही गजापुरची खिंड…ते ३०० स्पार्टन्स, हे ३०० मावळे…तो लिओनायडस, हा बाजीप्रभु…ते पर्शियन सैन्य, हे अदिलशाही सैन्य… दोन्ही लढाईत संघर्ष, आसूडांच्या नद्या, बेफाण लढवय्ये… एक जगजाहीर, एक मात्र अप्रसिध्द……
या मावळ्यांना, शिवा काशिद व बाजीप्रभु यांना त्रिवार मुजरा …………………………
सदर लेख मी माझ्या gadkot.in ब्लॉगवर प्रकाशित केला होता. आता गडकोट.इन डोमेन नसल्यामुळे इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
श्रीकांत लव्हटे | www.gadkot.in | इतिहासातील दुर्ग, दुर्गांतील इतिहास