आणखी काही चारोळ्या !!!!
मातीचा सुगंध पसरला आज अंगणी,
जणु तुझ्या आठवणींचा मोहोर शिंपला रुक्ष जीवनी…..
— श्रीकांत लव्हटे
आज खुप मोद वाटे मनाला…
रिमझिम पाउसधारा भिजवती धरणीला….
प्रिये तुही आठवतेस का अशी मला..
पाहात भिज-या हळुवार सांजेला…..
— श्रीकांत लव्हटे
दिवस जातात..
महिने सरतात..
वर्षामागुन वर्षेही संपतात..
सगळे अजुनही तसेच..
तोच पाउस.. तोच गारवा.. तोच बोचणारा वारा
ती कदाचीत त्याला विसरलीही असेल….
पण तो अजुनही तसाच…..
तिच्या आठवणीत झुरणारा……..
— श्रीकांत लव्हटे
विझल्या दिव्यांना पेटण्याची नसते आस
काय उरलय आता?
खुपशी रिकामी जागा आणि पेरभर काळवंडलेली वात…
तु येशीलही परत, तुला रहावणार नाही
पण खुप उशीर झालाय गं
या दिव्यात जळायला वातच उरली नाही…….
–श्रीकांत लव्हटे
आज नयनांत तिचीया
आठवण माझी हसली…
मग कविता माझी तीने
पुन्हा पुन्हा वाचली…..
–श्रीकांत लव्हटे
आयुष्य आता नव्या दष्टीने पाहु लागलोय
नवा दिवस खरंच नव्याने जगु लागलोय
नेहमीच वाचतो तुझ्या कविता
पण आजकाल त्यात मी मलाच शोधु लागलोय….
–श्रीकांत लव्हटे
थकलोय मी दडलेले प्रेम शोधुन
आता तरी मौन सोडशील का?
किती कवितेचे काढू अनेक अर्थ
एकदातरी स्व:ताहुन बोलशील का???
–श्रीकांत लव्हटे
वाट पाहुनीया तुझी
नेत्र मी कायमचे झाकले
जग म्हणाले बरे झाले गेला
वेडेपणाचे एक पर्व संपले…!!
–श्रीकांत लव्हटे
खुप काही करायचं होते आयुष्यात,
बरंचसे स्वप्नातच राहुन गेले…
सत्यात उतरवता उतरवता,
अवघं आयुष्यच संपुन गेले…
–श्रीकांत लव्हटे
अस्पष्ट रेषा
प्रश्न आणि उत्तर
एकाच नाण्याच्या दोन बाजु
दिवस आणि रात्र
एकाच संधेच्या दोन बाजु
कालची तु अन् आजची तु
तुझ्या एकाच नकाराच्या दोन बाजु
दोन्ही बाजु नेहमीच अस्तित्वात असतात
फक्त त्या प्रर्कषाने जाणवतात
मधली अस्पष्ट रेषा स्पष्ट झाल्यावर…………..
— श्रीकांत लव्हटे