आयुष्य……….
आयुष्याचे वरदान
शेवटपर्यंत जगायचे असते
सुखांनी साथ सोडली तर
दुखां:ना आपण हसवायचे असते
जवळच्यांनी बंध तोडले तरी
आपण नाते जपायचे असते
मरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्य
जगायला मागायचे असते
–श्रीकांत लव्हटे
जीवन……..हा खेळ
तू माझी आणि मी तुझा
याच आशेवर आजवर जगलो
मरणासण्ण या आयुष्यात
एकही क्षण तुला न विसरलो
जीवन हा खेळच क्षणभराचा
नाही होउ देणार तुझ्या आठवणींनचा
आशेवर जगणे बस झाले आता
कारण हा खेळ आहे
जिंकण्यासाठी पुढे चालत राहणा-यांचा……..
–श्रीकांत लव्हटे
येशील का………..
जीवनाच्या या वाटेवर
मी पुरता एकटा पडलो आहे
मित्रांचा गोतावळा आहे पण
मला तुझी गरज आहे
गेलेल्या वाटेवरुन
माघारी फिरुन
तशीच गोड हसत
येशील का पुन्हा परतुन….
–श्रीकांत लव्हटे
मी तिथेच उभा आहे…
यायचे आहे परत तर
विचार कसला करतेस
राहवत नाही एकटे तर
कोणाची वाट बघतेस
तशीच फिर मागे
ये पुन्हा धावत
मी तिथेच उभा आहे
तुझी वाट पाहत……….
–श्रीकांत लव्हटे
तुझ्याशिवाय माझे जीवन….
दु:ख मनात ठेउन चेह-यावर
हसु आता ठेववत नाही
तुझ्या आठवणीत रोज रडणारे
डोळे आता पुसवत नाहीत
तुझ्याशिवाय एकटे हे जीवन
जगताच येत नाही कारण
तुझ्याशिवाय माझे जीवन
मी जीवन मानत नाही…..
–श्रीकांत लव्हटे
नवीन गोष्टी कोणासाठी????
हसणं शिकवुन गेलीस
पण आता हसु तरी कोणासाठी
जगणं शिकवुन गेलीस
पण आता जगु तरी कोणासाठी
एकट्याला सोडून गेलीस अशी
आता नवीन गोष्टी शिकु तरी कोणासाठी????
–श्रीकांत लव्हटे
वेळ
नेहमी हे असेच होते
वेळ निघुन गेल्यावर
मन भानावर येते
बोलायचे तेव्हा बोलणे होत नाही
नी ती गेल्यावर डोळ्यात रडू येते…..
–श्रीकांत लव्हटे
दीपस्तंभ
लहान भोवरा असो वा त्सुनामी
तुझ्यासाठी सर्वकाही पार करीन
तु फक्त उभी रहा दीपस्तंभासारखी
मी आयुष्यभर पोहत राहीन…
–श्रीकांत लव्हटे
अस्तित्व
स्वप्नात काय मी वास्तवातसुध्दा
मी फक्त तुझ्याचसाठी जगलो
तुलाच माझे अस्तित्व मानता मानता
मीच आयुष्यातुन हरवलो….
–श्रीकांत लव्हटे
आसवांचे काय……….
शब्दांचं एक बरं असते
कवितेतुन कागदावर सांडून तरी जातात
पण डोळ्यातल्या आसवांचे काय
त्यांना डोळ्यातही राहता येत नाही
नि गालांवर ओघळूनही जाता येत नाही……..
–श्रीकांत लव्हटे
आलेला दिवस
विचार न करता ती जाते
तरीही जीव तिच्यासाठीच झुरतो
आपल्या हातात काहीच नसते हो
म्हणुनच,आलेला दिवस ढकलावा लागतो
–श्रीकांत लव्हटे
Comments
Hi shree… charolya vachlya… khuuup manapasun lihilya aahet tya tu… keep it up mitra…