चारोळ्या भाग ३

संपलेल्या युध्दात……

मनात जिद्द असली तरी,
जगण्यासाठी प्रेरणा लागते
एकट्याने आयुष्य जगता येत नाही,
कोणाचीतरी सोबत लागते
संपलेल्या युध्दात
आता जिंकायचा,
प्रयत्न करायचा नाही मला
रोज रोज मरत आता,
जगायचे नाही मला…..
–श्रीकांत लव्हटे

विरह….

विरहात नेहमी असे का होते
एक व्यक्ती सहज निघून जाते
दुसरी मात्र आठवणींमध्ये
तिलाच शोधत राहते…..
–श्रीकांत लव्हटे

विरहाचे दोन क्षण….

विरहाचे दोन क्षण कधी
तु ही अनुभवून बघ
कधीतरी कातरवेळी तु ही
मला आठवून बघ
कदाचीत तुला समजुन येईल
विरहाचे दु:ख काय असते
प्रिय व्यक्तिच्या जाण्याणे
मनात काय खळबळ माजते…
–श्रीकांत लव्हटे

अबोल भावना ….

मलाही वाटायचं रोज तुझ्याशी बोलावं
स्वप्नात काय वास्तवातही तुझ्याबरोबर असावं
तुला दुर जाताना पाहून ह्र्दय माझं कापले होते
तुझ्या आठवणींनी डोळेही पाणावले होते
पण मी कधी तुला हे बोललोच नाही
आणि तुला कधी अबोल भावना कळल्याच नाही……..
–श्रीकांत लव्हटे

घरच्या भिंतीनाही …

तुझा सहवास आता संपलाय
हे त्या घरच्या भिंतीनाही कळलंय
मग मी तरी घरात काय करु
म्हणून मी आता बाहेर
चांदन्यात ठाण मांडलय
–श्रीकांत लव्हटे

स्मितहास्य….

तुझे स्मितहास्य हे फक्त हास्यच होते
हे मला त्यावेळी उमगले नव्हते
मी ही वेड्यासारखे त्यात माझ्या
प्रश्नांचे होकार शोधले होते
आज तुझ्या डोळ्यांमध्ये
मला साधी ओळखही नाही
म्हणुन आजकाल कुणाच्याही
हास्याला उत्तर देववत नाही….
–श्रीकांत लव्हटे

खरं प्रेम..

ख-या सोन्यालाच अग्नीपरीक्षा द्यावी लागते
ख-या प्रेमालाच या जगाततडफडावे लागते
पण त्या तडपण्यात एक वेगळीच मजा असते
रिकाम्या रस्तावरही वाट पाहण्यात वेगळीच मजा असते……
–श्रीकांत लव्हटे

जीवन……..हा खेळ

तू माझी आणि मी तुझा
याच आशेवर आजवर जगलो
मरणासण्ण या आयुष्यात
एकही क्षण तुला न विसरलो
जीवन हा खेळच क्षणभराचा
नाही होउ देणार तुझ्या आठवणींनचा
आशेवर जगणे बस झाले आता
कारण हा खेळ आहे
जिंकण्यासाठी पुढे चालत राहणा-यांचा……..
–श्रीकांत लव्हटे

बंद पाकिट…..

बंद पाकिटे ही,
उघडण्यासाठीच असतात
त्यातल्या आठवणींना,
उजाळा देण्यासाठीच असतात
कधी त्याही आठवणींशी,
नजरानजर करावी
डोळ्यातल्या अश्रुंनाही,
कधीतरी वाट करुन द्यावी…
–श्रीकांत लव्हटे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *