• Poems
 • आयुष्य..

  आयुष्य………. आयुष्याचे वरदानशेवटपर्यंत जगायचे असतेसुखांनी साथ सोडली तरदुखां:ना आपण हसवायचे असतेजवळच्यांनी बंध तोडले तरीआपण नाते जपायचे असतेमरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्यजगायला मागायचे असते–श्रीकांत लव्हटे एकतर्फी माझ्या एकतर्फी प्रेमाचीतिला कधी माहीतीच नव्हतीकदाचित तिचे प्रेम मिळण्याचीमाझी कधी लायकीच नव्हती….–श्रीकांत लव्हटेआठवणी भावनांचा खेळ चालुच राहणारतिच्या विचारात मन पुन्हा रमणारआठवणींचे काय, त्या तर येतच राहणारपण स्व:तबरोबर त्या तिला कधी […]

 • Poems
 • आयुष्याची नवी सुरवात..

  . नवी आशा, नवी उमंग नवी दिशा नवे तरंग नवा उल्हास, नवी चेतना नवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा नवा सूर्योदय नवी पहाट नवा निसर्ग नवा दिवस नवीन क्षितिज नवे आभाळ नवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच विश्वास ज्योतीने फुलवली आशेची विझलेली वात नव्या जोमाने आता आयुष्याची नवी सुरवात –श्रीकांत लव्हटे .

 • Poems
 • मी आभारी आहे तुझा……….

  मी आभारी आहे तुझा माझ्या जीवनात येण्याबद्दल आणि येउन पुन्हा एकट्याला सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझा मला स्वप्नं दाखवल्याबद्दल स्वप्नातुन परत वास्तवात आणल्याबद्दल मी आभारी आहे तुझा दोन पाउलं बरोबर चालल्याबद्दल आणि पुढचा प्रवास अर्धात सोडून गेल्याबद्दल मी आभारी आहे तुझा जीवनाच्या होडीला दिशा दिल्याबद्दल जाता जाता याच होडीला वादळात सोडून गेल्याबद्दल बरं झालं […]

 • Poems
 • आठवतंय का तुला..

  आठवतंय का तुला, तु मला पहिल्यांदा दिसली होतीस मग मला ही दुनिया खुपच छान भासली होती आठवतंय ना तुला, तु माझ्याशी पहिल्यांदा बोलली होतीस त्या चार सेकंदात मी पुर्ण लाईफ जगली होती आठवतंय एकदा, दुर मैत्रिणींमधुन तु मला ‘हाय’ केलं होतस माझं मलाच जाम कौतुक वाटलं होतं खुप आठवतात मला ते सोनेरी क्षण रुपेरी स्वप्नांमध्ये […]

 • Poems
 • सांग तिला…माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी

  खुप झाल्या कविता आणि पुरे झाल्या चारोळ्या अजुन किती दिवस ऐकशील रे त्या दर्दभ-या आरोळ्या सतत तिचा विचार करणे कॉलेजमध्ये तिलाच शोधणे जवळच्या मित्राशी बोलतानाही सतत तिचाच विषय काढणे तिच्याशी बोलावे ही एकच इच्छा आणि दिवसभर त्याचीच स्वप्ने समोर आली की मात्र जुजबी बोलुन गप्प बसणे अरे किती दिवस चालणार असे कधी सांगणार आहेस तिला […]

 • Poems
 • आता सगळीच गणितं चुकली आहेत..

  आता जीवनाची चक्रे थांबली आहेत, आयुष्याचा प्रवासच जणू थबकला आहे माहीत आहे की तु येणार नाहीस, तरीसुध्दा वेडे मन हे तुझ्याच वाटेला डोळे लाऊन बसले आहे पहाटेचा उत्साह आता राहीला नाही, संध्याकाळ म्हणावी तशी रम्य होत नाही सगळं कसं चुकल्या चुकल्यासारखं वाटतयं कळत असुनही मन पुन्हा पुन्हा तिकडेच धावतयं सकाळची गुलाबी थंडी, संध्याकाळची सोनेरी किरणे, […]

 • Poems
 • परतुन येशील का ????

  जाणारच होती अशी निघून तर आलीसच का माझ्या आयुष्यात…. अश्रु देणारच होतीस डोळ्यात तर दिलंसच का हसु माझ्या ओठांत.. वाट सोडूनच जाणार होतीस तर चाललीसच का दोन पावलं बरोबर.. स्वप्नं पुर्ण करायचीच नव्हतीत तर ती दाखवलीसच का.. ह्रदयात राहणार नव्हतीस तर का मनाची दारं उलगडून गेलीस.. कितीतरी प्रश्न आहेत आज मनात एकाचंतरी उत्तर दयायला परतुन […]

 • Poems
 • सारं काही संपले आहे….

  आता मला कळून चुकलंय की सारं काही संपले आहे आता चेह-यावरचं हसूसुध्दा माझ्यावरतीच रुसलं आहे तरीही प्रयत्न करतोय पुन्हा ऊभा राहण्याचा तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुन खाली उतरण्याचा आता भोवतालच्या जगात तु हरवली आहेस आणि माझ्या जगात मीच मला शोधत आहे रडण्यासाठी आता डोळ्यात अश्रु उरले नाहीत तुझ्याशिवाय माझे जीवन आता जीवन उरले नाही………… -श्रीकांत लव्हटे