मोठी माणसे का चुकतात

.

प्रस्तावना : मोठ्यांनी घेतलेले निर्णय हे सारासार विचार करुन असतात त्यामुळे अचुक आणि योग्य असतात – एक समज. पण हा विचार पालक करत नाहीत की माझी मुले माझ्यापेक्षा जास्त चांगला, व्यापक विचार करत असतील. या गैरसमजापायी वर्षानुवर्षे पालक आपले निर्णय (शिक्षण, करीयर, विवाह) लादत आलेत आणि नात्यांच्या प्रेमापोटी पाल्य ते सहन करत आलाय. तर अशा सर्व पालकांसाठी…. बघा थोडा विचार करुन…..

मोठी माणसे का चुकतात
कधी कधी अशी वेड्यागत का वागतात
समोर बरोबर रस्ता दिसत असुनही
चुकीच्या रस्ताने का चालतात

तो त्याचा अभिमान म्हणावा का हट्टीपणा
का मुले अजुन लहान आहेत हा गैरसमज
आमचे निर्णय नेहमीच अविचारी असतात का
तुमचा कुठलाच निर्णय चुकला नव्हता का

मग हा अट्टहास कशासाठी
आमची स्वप्न मोडता, सांगुन आमच्याच भल्यासाठी

मग करता निर्णयाची समर्थने
वाचता पाहीलेल्या पावसाळ्याची पारायणे
तुमच्या भल्यासाठीच चाललंय सारं
सकाळ संध्याकाळ मग रोजचे ऐकवणे

मनावर असलेले संस्कार
नी स्वत:आधी केलेला तुमच्या स्वप्नांचा विचार
म्हणून निर्णय शांतपणे आपलेसे करतो
हसरा मुखवटा पुन्हा मिरवतो

लहानपणापासुन ऐकत आलो
वडीलधारे नेहमीच बरोबर असतात
यात थोडा बदल सुचवावासा वाटतो
कारण मोठी माणसेसुध्दा कधी कधी चुकतात………….
–श्रीकांत लव्हटे

.

1 Comment

  1. Nice..!!

Leave a Reply