चारोळ्या भाग ८

मनातले काही!!!

तिचा तो थरथरता स्पर्श 

नकळत कुठेतरी हरवुन गेला

त्याचा बाईकचा प्रवास मग

एकट्या वळणावर कायमचा थांबुन गेला….
–श्रीकांत लव्हटे


काही दिवसांचा आनंद
धुवुन गेला सारा
काही कडवट मने
उरली ओंजळीत त्याच्या
–श्रीकांत लव्हटे

तिच्याच प्रेमापोटी
तिलाच भेटला नकार
फक्त ओठ बोलले त्याचे
आसमंतात होते फक्त होकार
–श्रीकांत लव्हटे

माणसे चुकत नसतात गं
परीस्थीती त्यांचे निर्णय देते
कळेल का कधी तिला
जे दिसले तसे कधीच नव्हते…
–श्रीकांत लव्हटे

जगाची ही रीत सखे 

स्वार्थामागे सर्व पिसे… 

सरतेशेवटी आपणच आपले 
मरताना आत्माही आपला नसे….
–श्रीकांत लव्हटे
एक गुढ रात्र ….
मंतरलेली अंधारलेली ….
दाही दिशांना क्रुरपणे पसरलेली…
काळी सावली अंधाराची
कोमेजली कळी चैत्यन्याची…
वाटा संपल्या… क्षितीज हरवले…
एक गुढ रात्र.. आयुष्याची…
ना सरणारी… ना संपणारी…..
–श्रीकांत लव्हटे.
होईल का सगळे मनासारखे
मिळेस का सारे स्वप्नासारखे
दाही दिशांना विचारले….
काहीच उत्तर नाही..
हुंकार फक्त उमटले,
माहीत नाही…माहीत नाही…………
–श्रीकांत लव्हटे.

Leave a Reply