आयुष्य..

आयुष्य……….

आयुष्याचे वरदान
शेवटपर्यंत जगायचे असते
सुखांनी साथ सोडली तर
दुखां:ना आपण हसवायचे असते
जवळच्यांनी बंध तोडले तरी
आपण नाते जपायचे असते
मरतानासुध्दा देवाकडे अजुन एक आयुष्य
जगायला मागायचे असते
–श्रीकांत लव्हटे

एकतर्फी

माझ्या एकतर्फी प्रेमाची
तिला कधी माहीतीच नव्हती
कदाचित तिचे प्रेम मिळण्याची
माझी कधी लायकीच नव्हती….
–श्रीकांत लव्हटेआठवणी
भावनांचा खेळ चालुच राहणार
तिच्या विचारात मन पुन्हा रमणार
आठवणींचे काय, त्या तर येतच राहणार
पण स्व:तबरोबर त्या तिला कधी आणणार?????
–श्रीकांत लव्हटे

विरहामध्ये ……..

अस्तित्वाचा नाही तर भावनांशी खेळ झालाय
तिची वाट पाहण्यात माझा वेळ गेलाय…..
अश्रु तर आता डोळ्यातच सुकलेत
आशेचे अंकुर कधीच करपलेत
एकही थेंब अजुन मी थांबु शकणार नाही
कारण
विरहामध्ये कदाचित मी जगु शकणार नाही..
–श्रीकांत लव्हटे

किनारा….

वहावत आलो तुझ्याकडे
सर्वस्व माझे विसरुन
तुला पाहुन पाठमोरी
सा-या आशाच गेल्या विरुन
काय गुन्हा केला होता मी सखे
का थांबली नाहीत तु
किना-यावरती येउनसुध्दा
पुन्हा सागरात भरकटलो मी…..

–श्रीकांत लव्हटे

गुपित

सांग तरी काय गुपित
दडले तुझ्या मनी
पसरवुन टाक इंद्रधनु
माझ्या रुक्ष जीवनी….
–श्रीकांत लव्हटे

पाउस प्रेमाचा…..

पाउस प्रेमाचा तिला कधी कळलाच नाही
मैत्रीच्या नात्यात गुरफटलेल्या तिला
अंतरीचा ओलावा कधी जाणवलाच नाही
मी भिजलो नखशिंखांत जरी
तिला एका थेंबाचाही स्पर्श झाला नाही…
–श्रीकांत लव्हटे

Leave a Reply