आयुष्याची नवी सुरवात..

.

नवी आशा, नवी उमंग
नवी दिशा नवे तरंग
नवा उल्हास, नवी चेतना
नवीन जिद्द आणि जगण्याची प्रेरणा

नवा सूर्योदय नवी पहाट
नवा निसर्ग नवा दिवस
नवीन क्षितिज नवे आभाळ
नवीन पायवाटा नि जीवनाचा नवा रोमांच

विश्वास ज्योतीने फुलवली
आशेची विझलेली वात
नव्या जोमाने आता
आयुष्याची नवी सुरवात
–श्रीकांत लव्हटे

.

Leave a Reply