व्हेलेंटाईन दिवस, प्रत्येक मनातला दिवस

१४ फेब्रुवारी
व्हेलेंटाईन दिवस
तरुणाईचा दिवस
प्रत्येक मनातला दिवस
मनातल्या प्रत्येकासाठीचा दिवस

असा हा प्रेमाचा दिवस
लवकरच येणार आहे
कुणास ठाउक यावर्षी किती
ह्रदयांचा वेध घेणार आहे

पुन्हा भेटवस्तुची दुकाने
कार्ड आणि गिफ्टस् नी भरतील
कॉलेज कट्टे, बागा गुलाबी
रंगात न्हाउन निघतील

प्रत्येक जण आपला आपला प्लान
बनवत असतो आणि तो
इतरांहून कसा वेगळा आहे
हे ग्रुपला पटवुन देत असतो

यातले most प्लान
पार पडतच नाहीत
घेतलेली गिफ्ट, गुलाबे
तिला पोहचतच नाहीत

गुलाबं कोमेजतात
गिफ्ट कपाटात जातात
मनातल्या भावना
मनातच विरुन जातात

पण मित्रा हार मानु नकोस,
पुढल्या वर्षी तुझ्या हातातले गुलाब
तिच्या हातात असेल
कुणी सांगावे कदाचीत
तिच्या कपाटातही न
दिलेल्या गिफ्टची आरास असेल………
–श्रीकांत लव्हटे

Leave a Reply