College life… माझ्या सर्व तरुण मित्रांसाठी भाग ३

भाग १ आणि २ मध्ये “प्रेम” या विषयावर बरेच लिहून झाले आहे. College Life मध्ये प्रेमाबरोबर अजुन एक जिव्हाळ्याचा शब्द असतो तो म्हणजे “मैत्री”. याच विषयावर लिहून माझ्या आठवणींना उजाळा दिलाय. पहा तुम्हालाही आठवतो का तुमचा college group……

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय….
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत college कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्यानेLibrary कडे
पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Assignment copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस…
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण
आठवले कीडोळ्यात टचकन् पाणि येतं………….
-श्रीकांत लव्हटे

4 Comment

 1. ruta says: Reply

  khoop chan kavita aahe.
  very nice….
  especially kavitecha end khoopch chaan aahe

 2. mahesh says: Reply

  hey it was really awesome… n heart touching … if u have any other then pls forw. to Barve.mahsh@gmail.com

 3. You write very well.

 4. awesome man !!!!!!!!!!!!!

  keep writing………….

Leave a Reply