चारोळ्या भाग २

नव्या दिशा

आता सर्व स्वच्छ झाले आहे
माझं आकाश आता मोकळे झाले आहे
नव्या क्षितीजांवर नव्या दिशा खुणावत आहेत
मला अजून खुप दुरवर जायचं आहे!!!!!!!!!!!!
–श्रीकांत लव्हटे

चंदन………..

चंदनाचे जीवनच असं असते,
नेहमी दुस-यासाठी झिजायचे असते
स्वत: मरत असला तरी,
लोकांसाठी जगायचे असते
नात्यांच्या बंधाचेही असंच काहीसं असतं
नको असलेली काही नाती
आयुष्यभर वागवावी लागतात,
आणि मनात जपलेले काही बंध
आयुष्यभर अबोलच राहतात……..
–श्रीकांत लव्हटे

तुझे हसणे…

मी असा झुरत असताना
जर तु गालात हसत असशील
तर तुझ्या त्या हसण्यासाठी
मी आयुष्यभर झुरत राहीन….
–श्रीकांत लव्हटे

क्षण……

ह्रदयाच्या पेटीततले साठवलेले क्षण,
हातातुन वाळुसारखे निसटत चालले
या क्षणांचे मोल मात्र,
तु कधीही ना जाणलेस
आता मी एकटाच राहणार,
हे त्यांना मात्र निसटतांनाखील कळले…
–श्रीकांत लव्हटे

गोष्ट

गोष्ट आकाशातून कोसळणाय्रा सप्तधारांची संपली आहे
गोष्ट नभात इन्द्रधनु बांधणाय्रा जलधारांची संपली आहे
गोष्ट भिजवनाय्रा आठवणींची संपली आहे
कारणतिच्याच मनातील काय तर,
पावसामधलीही ती ओली मायाच संपली आहे….
–श्रीकांत लव्हटे

गंध

तिच्या आठवणीचा गंध आजही
सभोवताली दरवळत आहे
वा-याच्या प्रत्येक झुळुकेसोबत
तो मलाच खुणावत आहे
तु कुठे आहेस माहित नाही
वाट कुठली माहित नाही
तरीही मन मात्र वेड्यासारखे
सैरावैरा पळत आहे….
–श्रीकांत लव्हटे

तुच त्याला विसरली नाहि ना?

त्यानेही वाट पाहिली असेल,
तु स्वप्नात येण्याची
त्याचेही डोळे भरले असतील,
आसवांच्या झ-यांनी
भावनांना आवर घालुन,
समजुत घातली त्याने मना
खुप वाट पाहीली कदाचीत,
तुच त्याला विसरली नाहि ना?
–श्रीकांत लव्हटे

तर नको मला हे आयुष्य

जर असे एकट्याने जगायचे असेल
तर नको मला हे आयुष्य
तुला विसरायला छोट्या छोट्या गोष्टीत मन रमवायचे असेल
तर नको मला हे आयुष्य
तुझ्याशिवाय आयुष्य मनसोक्त कसे जगता येइल??????
आणि जर मनसोक्त जगता येणार नसेल
तर नको मला हे आयुष्यतर नको मला हे आयुष्य……
–श्रीकांत लव्हटे

Leave a Reply