पुन्हा कवितांच्या गावात..

मित्रांनो, जवळपास एका महिन्यानंतर मी ही कविता लिहीत आहे. एका महिन्यापुर्वी मी कविता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. But i realise खरंच कविता एक अशी सोबत आहे जी प्रत्येक वळणावर साथ देते. So मी पुन्हा कवितांच्या गावात यायचे ठरवले आहे. त्याच अनुषंगाने आज ही कविता लिहीली आहे…….

आज पुन्हा मी कवितेंच्या
देशात येत आहे
झाले गेले विसरुन झाले
पुन्हा इथे परतत आहे

झाले गेले खुप झाले
पुन्हा त्यावर विचार नाही
आता ठरवलंय मी आयुष्यात
मागे वळुन पहायचे नाही

राखेतुन हा फिनिक्स पक्षी
जोमाने उभा राहणार आहे
पहिल्यापेक्षा अधिक प्रभावीपणे
कागदावर लेखणी चालवणार आहे

कुणी कुणाचे नसते
हेच खरे आहे
जिथे अश्रुंनाही किंमत नसते
तिथे त्यांना ढाळण्याची काय गरज आहे

अश्रुंचे खेळ बंद करुन
आता जोमाने चालण्याची गरज आहे
कारण नवे क्षितीज खुणावतंय
मला तिथवर पोहोचायचे आहे

मला इथे परत आणण्यात
मोलाचा वाटा तुमचाच
तुमच्यामुळेच तुमच्यासाठीच
मी श्रीकांत पुन्हा तुमचाच….

–श्रीकांत लव्हटे

Leave a Reply