जेव्हा तु हसतेस..

जेव्हा तु हसतेस
अजुन सुदंर दिसतेस
मग मैत्रीणींच्या घोळक्यातसुध्दा
अजुन उठून दिसतेस

जेव्हा तु बघतेस
माझ्या नजरेलाच रोखुन ठेवतेस
त्या नजरेच्या पलीकडचंही
काहितरी सांगुन जातेस

जेव्हा तु बोलतेस
सा-या जगाचा विसर पाडतेस
मग माझ्या शब्दांनाही
तुझ्यासमोर अबोल करतेस

जेव्हा तु निघून जातेस
माझी सोबत सोडतेस
आयुष्याच्या वाटेवरचा
माझा प्रवासच थांबवतेस………………….
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply