कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस…

तेव्हाही होताच की हा गार पावसाळा
रिमझिमणा-या सरींचा कोसळणा-या धबधब्यांचा
पण त्याच्यांतली नि:शब्दता कधी जाणवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस……………

तेव्हाही होतच होती रोज संध्याकाळ
रूपेरी किरणांचा असा तो काळ
पण ती कातरवेळ कधी अनुभवलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस……………

तेव्हाही स्वप्नांच्या देशा जायचे मन
मग मी जगायचो तिथला प्रत्येक क्षण
परतल्यावर कधीच कोणाची आठवण झाली नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस……………

तेव्हाही जीवनाच्या वाटेवर चालतच होतो
कधी सुखात तर कधी दु:खात
पण कधी सोबतीची गरज वाटलीच नव्हती
कारण तेव्हा तु माझ्या आयुष्यात आली नव्हतीस……………
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply