एक अश्रु…

जेव्हा असतो बाळाचा, आई असते टिपायला
जेव्हा असतो पावसाचा, धरती असते टिपायला
जेव्हा असतो श्रमाचा, विसावा असतो टिपायला
जेव्हा असतो दु:खाचा, मित्र असतो टिपायला
जेव्हा असेल माझा, तेव्हा तु येशील ना टिपायला ?……………
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply