श्रावण..

श्रावण…….. रिमझीम धारांचा, कोसळणा-या सरींचा
श्रावण…….. थंड वा-याचा, डोंगरावरच्या ढगांचा
श्रावण…….. लोभस इंद्रधनुष्याचा, ऊन पावसाच्या लपंडावाचा
श्रावण…….. नव्या हिरवाईचा, झुळूझुळू वाहणा-या ओढयांचा
श्रावण…….. नाचणा-या मोरांचा, पानांमधुन लाजणा-या फुलांचा
श्रावण…….. उत्स्फुर्त गीतांमधला, निर्सगाच्या उत्सवाचा
श्रावण…….. माझ्या मनातला, तिच्या गोड आठवणींचा………………………
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply