कदाचीत तु हो म्हणशील..

तुला पहिल्यांदा पाहील्यापासुनच
अगदी पहिल्या दिवसापासुनच
मनात ठरवलं होतं की तुला विचारावं
कुणी सागांवं कदाचीत तु हो म्हणशील

पण दरवेळी बोलताना थांबांयचो
हिम्मतच नाही करु शकायचो
मन नेहमी म्हणायंचं की सांगुन टाक एकदाचं
कदाचीत ती हो म्हणेल

असे करत कित्येक दिवस गेले
दिवसामागुन महीनेही सरले
कारण खरंच काही उमगत नव्हतं
की तु हो म्हणशील की नाही

पण मी कधीच बोलु शकलो नाही
मनातलं ओठांवर आणू शकलो नाही
आजही अबोल असा याच आशेवर आहे
की कदाचीत तु हो म्हणशील
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply