सारं काही संपले आहे….

आता मला कळून चुकलंय
की सारं काही संपले आहे
आता चेह-यावरचं हसूसुध्दा
माझ्यावरतीच रुसलं आहे

तरीही प्रयत्न करतोय
पुन्हा ऊभा राहण्याचा
तुझ्या आठवणींच्या हिंदोळ्यांवरुन
खाली उतरण्याचा

आता भोवतालच्या जगात
तु हरवली आहेस
आणि माझ्या जगात
मीच मला शोधत आहे

रडण्यासाठी आता
डोळ्यात अश्रु उरले नाहीत
तुझ्याशिवाय माझे जीवन
आता जीवन उरले नाही…………
-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply