आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे…

आजकाल अश्रु करतात नेहमीच गांलावर खेळ
मग प्रत्येक संध्याकाळ होते सुरेख कातरवेळ
तुझा चेहरा आजही मनाच्या आरशात हसत आहे
तुझ्या आठवणींबरोबर आजही जगत आहे

आठवणींच्या धुक्यात मन स्वत:ला हरवून बसतं
मग वास्तवात आल्यावरही स्वत:ला शोधत राहतं
नकोत मला तुझ्या आठवणी असं रोजच म्हणतो आहे
तरीही तुझ्या आठवणींबरोबर आजही जगतो आहे

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण रोज एकटयानेच अनुभवतो
वास्तवाला विसरुन स्वत:ला स्वत:त हरवून बसतो
मन म्हणतं ते क्षण तुझ्या नशिबी आले हे काय कमी आहे
हाच विचार करत आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे

तु गेल्यावर वाटलं सर्व संपलं
स्वत:लाही संपवून टाकावं
पण विचार केला प्रेम अमर असतं मी का त्याला संपवावं
म्हणूनच की काय आजही तुझ्या आठवणींबरोबर जगतो आहे

-श्रीकांत लव्हटे

Leave a Reply